Gold Silver Rate 8 September 2025: सोमवारी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या. गेल्या आठवड्यात विक्रमी स्तर गाठल्यानंतर गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून आलेल्या कमकुवत संकेतांमुळे ही घसरण झाली आहे.
MCX वर ऑक्टोबर डिलिव्हरीचे सोने ₹606 (0.56%) नी कमी होऊन ₹1,07,122 प्रति 10 ग्रॅमवर आले. डिसेंबर डिलिव्हरीचे सोनेही ₹612 नी घसरून ₹1,08,176 प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होते. याआधी शुक्रवारी सोने ₹1,07,807 प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते.
आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचाल
आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव दिसून आला. Comex वर डिसेंबर गोल्ड फ्युचर्स 0.68% नी घसरून USD 3,628.35 प्रति औंसवर आले. स्पॉट गोल्ड USD 3,584.40 प्रति औंसवर पोहोचले.
सिल्व्हरमध्येही घसरण झाली असून Comex फ्युचर्स USD 41.26 वर, तर स्पॉट सिल्व्हर USD 40.64 प्रति औंसवर आहे.
किंमती घसरण्यामागील कारणं
रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ संशोधन विश्लेषक जिगर त्रिवेदी यांनी सांगितले की, चीनचा सेंट्रल बँक (PBoC) सलग दहाव्या महिन्यात आपल्या सुवर्णसाठ्यात वाढ करत आहे.
ऑगस्टमध्ये चीनचा सुवर्णसाठा 74.02 दशलक्ष ट्रॉय औंसवर पोहोचला असून त्याची किंमत 253.84 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. हा निर्णय अमेरिकन डॉलर्सवरील अवलंबित्व कमी करण्याच्या धोरणाचा भाग मानला जातो.
GST Cut नंतर Tata Nexon स्वस्त! फक्त इतक्यात घरी आणा SUV
पुढे किंमती कुठवर जाणार?
गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार, जर फेडरल रिझर्व्हवर राजकीय दबाव वाढला आणि ट्रेझरी बाँडमधून भांडवल बाहेर पडले, तर सोन्याची किंमत प्रति औंस $5,000 पर्यंत पोहोचू शकते.
तज्ज्ञांचे मत आहे की सध्याची घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी खरेदीची आकर्षक संधी ठरू शकते.
सणासुदीचा काळ सोन्याला बळ देणार
भारतातील सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी नेहमीच वाढते. त्यातच जागतिक आर्थिक अनिश्चितता, महागाईचा दबाव आणि डॉलरमधील चढ-उतार यामुळे सोने आणि चांदीची किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती बाजारातील उपलब्ध आकडेवारी आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. Dainikmaharastra.in गुंतवणुकीसंबंधी कोणताही सल्ला देत नाही. सोने, चांदी किंवा अन्य कोणत्याही साधनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

योगेश कोल्हे हे व्यवसाय, शेअर बाजार, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील घडामोडी या विषयांवर लेखन करणारे एक उत्साही लेखक आहेत. ते वाचकांना सोप्या व स्पष्ट भाषेत उपयुक्त, माहितीपूर्ण आणि अद्ययावत लेख उपलब्ध करून देतात.




