Honor Play 10T झाला लॉन्च – 7000mAh बॅटरी, धमाकेदार फीचर्स आणि बजेट किंमत

Honor Play 10T Price: स्मार्टफोन मार्केटमध्ये एकापाठोपाठ एक बजेट फोन येत असतानाच Honor ने चीनमध्ये आपला नवा स्मार्टफोन Honor Play 10T लॉन्च करून धडाकेबाज एन्ट्री घेतली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

दमदार Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर, जबरदस्त 7000mAh बॅटरी आणि बजेट-फ्रेंडली किंमत यामुळे हा फोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर मग जाणून घेऊया या फोनचे खास फीचर्स आणि किंमत…

Honor Play 10T चे फीचर्स एक नजरात

Honor Play 10T मध्ये 6.77 इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले दिला असून त्याची 120Hz रिफ्रेश रेट आणि 700 निट्स पीक ब्राइटनेस स्क्रीन अनुभव अफलातून बनवतात. डोळ्यांना आराम मिळावा म्हणून Eye Comfort Mode आणि मजबूत Aluminosilicate Glass Protection देखील दिले आहे.

हा फोन तीन स्टोरेज पर्यायात उपलब्ध आहे –

  • 8GB RAM + 128GB
  • 8GB RAM + 256GB
  • 12GB RAM + 256GB
कॅमेरा आणि बॅटरी पॉवर

फोटोग्राफीसाठी 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा तर सेल्फीसाठी 5MP फ्रंट कॅमेरा पंच-होल डिझाइनमध्ये आहे.बॅटरीबाबत हा फोन खरोखरच गेम-चेंजर आहे कारण यात आहे 7000mAh ची बॅटरी, जी 45W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येते.

कनेक्टिव्हिटी आणि इतर फीचर्स

फोनमध्ये 5G सपोर्ट, Wi-Fi 5, Bluetooth 5.1, NFC, सिंगल-फ्रिक्वेन्सी GPS, ड्युअल स्पीकर्स आणि IP65 रेटिंग दिली आहे. वजन 207 ग्रॅम असून जाडी फक्त 8.24mm आहे.

Honor Play 10T ची किंमत (Honor Play 10T Price)

चीनमध्ये या फोनची विक्री सुरू झाली आहे.

  • 8GB/128GB मॉडेल – CNY 999 (सुमारे ₹12,500)
  • 8GB/256GB मॉडेल – CNY 1199 (सुमारे ₹15,000)
  • 12GB/256GB मॉडेल – CNY 1399 (सुमारे ₹17,300)

हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि व्हाइट या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

OnePlus वापरताय? मग हे 3 Secret Features लगेच वापरा, फोन वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलेल!

भारतात कधी येणार?

सध्या हा फोन फक्त चीनमध्ये लॉन्च झाला आहे. मात्र Honor चे इतर डिव्हाइस जसे भारतात दाखल झाले आहेत, तसाच Honor Play 10T भारतात येण्याची शक्यता जोरदार आहे. जर तो इथे लॉन्च झाला, तर Redmi आणि Realme सारख्या ब्रँड्सना नक्कीच स्पर्धा मिळणार यात शंका नाही!

तर Tech Lovers, तुम्ही Honor Play 10T च्या 7000mAh बॅटरी आणि बजेट किंमतीला किती मार्क्स द्याल? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Comment