Renault Kwid होणार स्वस्त! GST 2.0 मुळे गाडीवर तब्बल हजारोंची सूट, जाणून घ्या आता कितीला मिळणार कार

Renault Kwid Price After GST Cut: स्वस्त आणि किफायतशीर कार घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. देशातील लोकप्रिय बजेट कार Renault Kwid आता आणखी परवडणाऱ्या किंमतीत मिळणार आहे. 22 सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या GST 2.0 स्लॅब मुळे या कारची किंमत जवळपास ₹55,095 पर्यंत कमी होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
किंमत कशी कमी होणार? ( Renault Kwid After GST Cut )

नव्या GST स्लॅबअंतर्गत एंट्री-लेव्हल कारवरील टॅक्समध्ये मोठी कपात होणार आहे. सध्या Kwid च्या बेस व्हेरिएंट RXE MT ची किंमत ₹4.70 लाख आहे. पण 9.93% टॅक्स कपातीमुळे या कारची किंमत थेट घटून ₹4.15 लाखांपर्यंत येणार आहे. म्हणजेच ग्राहकाला तब्बल अर्धा लाख रुपयांचा फायदा मिळणार आहे

कितीला मिळणार Renault Kwid? (Renault Kwid Price After GST Cut)
  •  सध्याची किंमत : ₹4,70,000
  •  टॅक्स कपात : ₹55,095
  •  नवी किंमत : ₹4,14,905 (अंदाजे)

म्हणजेच आता Renault Kwid खरेदी करणे साधारण बाईकच्या किंमतीच्या आसपास परवडणारं ठरणार आहे.

Renault Kwid चे दमदार फीचर्स

Renault Kwid Price After GST Cut 2

Renault Kwid फक्त किंमतीमुळेच नाही तर फीचर्समुळेही ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. यात 999cc चा 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन दिला असून तो 68 BHP ची पॉवर व 91 Nm टॉर्क निर्माण करतो.

या कारची लांबी 3731mm असून 184mm ग्राउंड क्लिअरन्स दिला गेला आहे. त्यामुळे ही कार शहरात आणि खडबडीत रस्त्यावरसुद्धा सहज चालवता येते. 279 लिटरचा बूट स्पेस असल्याने लांब प्रवासातसुद्धा ही कार आरामदायी ठरते.

Suzuki Hayabusa Special Edition 2025: स्टायलिश लूक, दमदार परफॉर्मन्स, लॉन्चपूर्वी जाणून घ्या सगळं!

ग्राहकाना आकर्षित करण्यासाठी Renault ने Kwid मध्ये एकूण 5 Dual-Tone कलर ऑप्शन्स दिले आहेत. त्यात नुकतेच 3 नवे कलर कॉम्बिनेशन्स जोडले गेले आहेत, जे खासकरून युवांसाठी आकर्षण ठरू शकतात.

Renault Kwid आधीच स्वस्त कारच्या यादीत टॉपवर आहे. आता किंमत जवळपास ₹4.15 लाखांपर्यंत खाली आल्यानंतर ही कार पुन्हा एकदा बजेट सेगमेंटमध्ये सर्वाधिक मागणी असलेली कार बनण्याची शक्यता आहे.

जर तुम्ही बजेट कार शोधत असाल तर 22 सप्टेंबरनंतर Renault Kwid बुक करणं सर्वात फायदेशीर ठरेल. कारण “देशातील स्वस्तातली कार आता होणार आणखी स्वस्त!

Leave a Comment