राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नुकसानभरपाईसाठी निधी मंजूर, पाहा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार फायदा

Nuksan Bharpai Navin Yadi: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर एक आनंदाची बातमी आली आहे. २०२५ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा फटका लाखो शेतकऱ्यांना बसला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता शासनाने पहिल्या टप्प्यात नुकसानभरपाईचा निधी मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे जमा होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार नुकसानभरपाई? (Nuksan Bharpai Navin Yadi)

शासनाने नुकतीच Nuksan Bharpai Navin Yadi जाहीर केली आहे. त्यात खालील आठ जिल्ह्यांचा समावेश आहे:

  • रायगड
  • रत्नागिरी
  • सिंधुदुर्ग
  • नागपूर
  • वर्धा
  • चंद्रपूर
  • हिंगोली
  • सोलापूर
विभागानुसार निधीचा तपशील

 नागपूर विभाग (जून-ऑगस्ट २०२५):

या विभागातील तब्बल ८४,३४६ शेतकऱ्यांना ७३ कोटी ५४ लाख ३ हजार रुपयांचा निधी मंजूर.

  • नागपूर: ७,४५१ शेतकऱ्यांना ३.९२ कोटी
  • वर्धा: ३,६४८ शेतकऱ्यांना २.३० कोटी
  • चंद्रपूर: ११,७४२ शेतकऱ्यांना ७.३३ कोटी
  • हिंगोली: ३९५ शेतकऱ्यांना १८.२८ लाख
  • सोलापूर: ५,९१० शेतकऱ्यांना तब्बल ५९.७९ कोटी

कोकण विभाग (जून २०२५):

१,८७५ शेतकऱ्यांसाठी ३७ लाख ४० हजार रुपये मंजूर.

  • रायगड: ९८० शेतकऱ्यांना ११.८१ लाख
  • रत्नागिरी: ५६० शेतकऱ्यांना १२.९६ लाख
  • सिंधुदुर्ग: ३३५ शेतकऱ्यांना १२.६३ लाख
इतर जिल्ह्यांमध्ये कधी मिळणार नुकसान भरपाई?

नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू आहेत. प्रशासन सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व अहवाल शासनाकडे पाठवणार असून, ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

नुकसान किती मोठं?
  • जानेवारी २०२५ पासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरामुळे तब्बल ३९ लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
  • या आकड्यात फळबागा, पिके, शेतजमीन, जनावरे, घरे यांचाही समावेश आहे.
  • अंतिम आकडेवारी १५ सप्टेंबरनंतर आली की, हा आकडा ४५ लाख एकर (२०-२१ लाख हेक्टर) इतका होण्याची शक्यता आहे.
  • एकूण नुकसानभरपाईचा खर्च तब्बल ३ ते ३.५ हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो.

मराठा-कुणबी प्रमाणपत्र हवंय? या सोप्या पद्धतीने काढता येईल कुणबी सर्टिफिकेट! असा करा अर्ज 

शेतकऱ्यांसाठी पुढचा मेसेज

शासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आलं आहे की, आपली नुकसानीची माहिती वेळेत प्रशासनाला द्या. पुढील सूचनांनुसार नुकसानभरपाई थेट खात्यावर जमा केली जाईल.

या नुकसानभरपाईच्या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना किमान काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आकाशातून आलेल्या संकटानंतर आता शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या पिकासोबतच त्यांच्या मनालाही थोडी हिरवाई देईल का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल!

Leave a Comment