हार्दिक जोशीचा जबरदस्त कमबॅक! अरण्य टीझर पाहून प्रेक्षक थक्क; १९ सप्टेंबरला होणार धमाका

Aranya Teaser : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे ‘अरण्य’. हार्दिक जोशीच्या प्रमुख भूमिकेत येणाऱ्या या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि पाहता पाहता सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. मात्र या टीझरला मिळाल्या मिश्र प्रतिक्रिया – कुणी कौतुक करतंय तर कुणी तिखट टीका.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
कथा नेमकी कशाबद्दल आहे?

टीझरवरून चित्रपटाची झलक बघितली तर स्पष्ट होतं की ही कथा अतिरेकी प्रवृत्ती, वैचारिक संघर्ष आणि बदललेल्या आयुष्याभोवती फिरते.

हार्दिक जोशी सुरुवातीला अतिरेकी विचारधारेत गुरफटलेला दिसतो. पण जेव्हा तो बाप होतो, तेव्हा त्याचं मनोविश्व पालटतं. हिंसेचा मार्ग सोडून शांतताप्रिय जीवनाकडे वळायचा त्याचा प्रयत्न मात्र त्याच्या जुन्या टोळीला अजिबात रुचत नाही. त्यातून उभा राहतो संघर्ष, जीवघेणी चढाओढ आणि भावनिक द्वंद्व.

टीझरमध्ये काय दिसलं? (Aranya Teaser)

टीझर पाहताना जाणवतं की मेकर्सनी विषय मोठा घेतला असला तरी प्रेझेंटेशन मात्र गंडलंय.

  • अनावश्यक स्लो मोशन शॉट्स,
  • तेच तेच रिपीट केलेले सीन,
  • सिरीयलसारखी प्रोडक्शन व्हॅल्यू,यामुळे प्रेक्षक थोडेसे निराश झाले.

एक शॉट तर सोशल मीडियावर चर्चेत आलाय – एका लहान मुलीच्या हातात बंदूक दिल्याचं दृश्य टीझरमध्ये तब्बल तीन वेळा रिपीट करण्यात आलं आहे. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

चित्रपटातले डायलॉग्स अतिशय शुद्ध मराठीत आहेत. पण प्रेक्षक म्हणतात, अशा कथानकात स्थानिक बोलीभाषा वापरली असती तर दृश्यं अधिक रिअलिस्टिक वाटली असती. त्यामुळे पात्रं कृत्रिम भासतायत, असं मत व्यक्त केलं जातंय.

हार्दिक जोशीचा नवा अवतार

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेमधील रणादा या रोलमुळे घराघरात पोहोचलेले हार्दिक जोशी आता वेगळ्याच रंगात दिसत आहेत. गंभीर, भावनिक आणि अॅक्शनने भरलेला त्यांचा हा अवतार प्रेक्षकांना थक्क करत आहे. त्यांच्या जोडीला ऋतिका पाटील, विना जगताप आणि विजय निकम यांसारखे दमदार कलाकारही आहेत.

कर्करोगाला चिरडणारी नवी लस आली – रशियाचा वैज्ञानिकांचा दावा, जाणून घ्या कधी मिळणार

रिलीज डेट आणि अपेक्षा

अरण्य’ हा चित्रपट १९ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये झळकणार आहे.

आता मोठा प्रश्न असा की – हा चित्रपट फक्त वाद निर्माण करणार का? की खरंच एक आगळावेगळा संदेश देऊन प्रेक्षकांच्या मनात घर करणार?

टीझरवरून एक गोष्ट नक्की – ‘अरण्य’ हा चित्रपट हलकाफुलका नाही. तो समाज, हिंसा आणि वैयक्तिक निवडींवर प्रेक्षकांना विचार करायला लावणार आहे. दिग्दर्शकाची बाजू कोणती असेल हे कळायला अजून काही दिवस बाकी आहेत. पण एक गोष्ट निश्चित – हार्दिक जोशीचा हा नवा अवतार प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता नक्कीच वाढवतोय!

तुमचं काय मत आहे? हार्दिक जोशीचा हा बदललेला लूक तुम्हाला आवडला का? की टीझर पाहून तुम्ही निराश झालात? कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Comment