भारताचा सर्वात श्रीमंत इंजिनिअर कोण? नाव ऐकून थक्क व्हाल; खिशात तब्बल ₹9 लाख कोटींची संपत्ती!

भारताचा सर्वात श्रीमंत इंजिनिअर कोण: आज १५ सप्टेंबर, म्हणजेच राष्ट्रीय अभियंता दिन (National Engineers’ Day). देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे महान अभियंते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा हा जन्मदिवस.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

याच खास दिवशी आम्ही तुम्हाला अशा एका इंजिनिअरबद्दल सांगणार आहोत, ज्यांचं नाव तुम्ही रोज ऐकता, पण एक इंजिनिअर म्हणून नाही, तर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून! चला तर मग जाणून घेऊया, कोण आहे हा ‘किंग’ इंजिनिअर…

भारताचा सर्वात श्रीमंत इंजिनिअर कोण?

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हेच भारताचे सर्वात श्रीमंत इंजिनिअर आहेत. हो, तुम्ही बरोबर वाचलंत!

आज जगाला आपल्या व्यवसायाने वेड लावणारे मुकेश अंबानी हे व्यवसायाने एक केमिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) मधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी (BE) मिळवली आहे.

एवढंच नाही, तर इंजिनिअरिंगनंतर ते थेट स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये (Stanford University) एमबीए (MBA) करण्यासाठी गेले होते. पण वडिलांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी त्यांनी शिक्षण अर्धवट सोडले आणि भारतात परतले. त्यानंतरचा इतिहास तर आपल्या सगळ्यांसमोरच आहे.

संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क ?

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, त्यांच्या खिशात दौलत किती आहे? फोर्ब्सच्या (Forbes) ताज्या आकडेवारीनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 104 अब्ज डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम तब्बल 9.17 लाख कोटी रुपये होते. या अफाट संपत्तीमुळे ते आज जगातील 18 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

त्यांची कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीज, आज पेट्रोकेमिकल्स, तेल, वायू, टेलिकॉम (Jio), रिटेल आणि मीडिया यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये दबदबा राखून आहे.

Green Energy कडे पाऊल हि टाकत आहेत पाऊल 

मुकेश अंबानी नेहमीच भविष्याचा विचार करतात. म्हणूनच त्यांनी आता रिलायन्सला ‘ग्रीन एनर्जी’च्या क्षेत्रात उतरवले आहे. त्यांची कंपनी पुढील 10-15 वर्षांत तब्बल 80 अब्ज डॉलर्स (सुमारे 6.6 लाख कोटी रुपये) या क्षेत्रात गुंतवणार आहे. यातून ते भारताला स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीत एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे पण वाचा

तुमच्या Google Pay-PhonePe मधून आता 10 लाख पाठवता येणार? जाणून घ्या UPI चा नवा नियम.

वडिलांचा वारसा आणि स्वतःची ओळख

धीरूभाई अंबानी यांनी एका छोट्या कंपनीच्या रूपात रिलायन्सची सुरुवात केली होती. वडिलांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी केवळ हा वारसा जपला नाही, तर त्याला एका नव्या उंचीवर नेले.

लहान भाऊ अनिल अंबानी यांच्याशी झालेल्या वादानंतरही त्यांनी आपली वेगळी वाट निर्माण केली आणि 2007 मध्ये ते भारताचे पहिले ‘रुपया ट्रिलियनेअर’ (1 लाख कोटी रुपयांची संपत्ती असलेले) बनले.

आज एका इंजिनिअरने आपल्या ज्ञानाच्या आणि दूरदृष्टीच्या जोरावर व्यवसायाचे एवढे मोठे साम्राज्य उभे केले आहे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

Leave a Comment