Dashavatar Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत असतात. पण जेव्हा एखादा भव्य-दिव्य सिनेमॅटिक एक्स्पीरियन्स येतो, तेव्हा प्रेक्षकांचा प्रतिसादही भन्नाट मिळतो. असाच काहीसा माहोल सध्या ‘दशावतार’ या चित्रपटाभोवती पाहायला मिळतोय.
रिलीज होताच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान गडगडाट केला आहे. फक्त ६ दिवसांत ९.४५ कोटींची कमाई करत ‘दशावतार’ने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केल्या भावना
चित्रपटातील मुख्य कलाकार दिलीप प्रभावळकर यांनी नुकतीच इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
ते म्हणाले – “मराठी प्रेक्षकांनी ‘दशावतार’ला जेवढं प्रेम दिलं, त्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. फक्त सहा दिवसांत ९.४५ कोटी ग्रॉस कलेक्शन गाठणं म्हणजे आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. हा यशस्वी प्रवास असाच सुरू राहो हीच इच्छा.”
स्टारकास्टमध्ये कोण कोण?
हा मल्टी स्टारर चित्रपट खरंच ड्रीम कास्ट घेऊन आलाय. यात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे अशा एकापेक्षा एक जबरदस्त कलाकारांचा सहभाग आहे.
दिग्दर्शनाची धुरा सुबोध खानोलकर यांनी सांभाळली असून, निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे यांच्यासह अनेकांनी केली आहे.
खास का आहे ‘दशावतार’?
‘दशावतार’ म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर कोकण कल्चर चं भव्य चित्रण आहे. कोकणातील लोककला, परंपरा, निसर्ग आणि पर्यावरणसंवर्धन यांचा मिलाफ सिनेमातून दिसतो. दमदार कथा, थरारक सस्पेन्स, तगडे कलाकार, सुंदर गाणी आणि सिनेमॅटिक भव्यता यामुळे हा चित्रपट मस्ट वाच ठरतो.
Dashavatar Box Office Collection
१२ सप्टेंबरला रिलीज झालेला हा सिनेमा पहिल्याच दिवशी ५० लाखांच्या ओपनिंगसह झेपावला.
- दुसऱ्या दिवशी – १.२५ कोटी
- तिसऱ्या दिवशी – २ कोटी
- चौथ्या दिवशी – १ कोटी
- पहिल्या वीकेंडमध्ये एकूण ४.७५ कोटींचा गल्ला
त्यानंतरही वाढता उत्साह पाहता, सहाव्या दिवशी हा आकडा थेट ९.४५ कोटींवर पोहोचला.
महाराष्ट्राबाहेरही धडाकेबाज रन
फक्त महाराष्ट्रापुरता नाही, तर गोवा, बेळगाव, बंगळुरू, इंदूर, हैद्राबादसारख्या शहरांतही ‘दशावतार’ची जोरदार क्रेझ दिसत आहे. पहिल्या आठवड्यात show count ६०० वरून थेट ९७५ वर गेला. हाऊसफुल्ल शोजमुळे प्रेक्षकांना तिकीट मिळवणंही कठीण झालं आहे.
तर आता प्रश्न असा – ‘दशावतार’ १० कोटींचा टप्पा किती लवकर पार करेल?प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता, हा सिनेमा मराठी बॉक्स ऑफिसवर नवं रेकॉर्ड करण्याची दाट शक्यता आहे.

सदाशिव गायकवाड हे मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रावर लेखन करणारे लेखक आहेत. ते वाचकांना सिनेसृष्टीतील घडामोडी, खेळांच्या बातम्या व विश्लेषण रोचक आणि सोप्या पद्धतीने सादर करतात.




