Drishyam 3 Release Date: मोहनलाल-अजय देवगण पुन्हा देणार प्रेक्षकांना थरारक अनुभव,या दिवशी होणार रिलीज 

Drishyam 3 Release Date: भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सस्पेन्स थ्रिलर म्हटलं की पहिल्यांदा आठवण होते ती “दृश्यम” मालिकेची. मलयाळममध्ये मोहनलाल (Mohanlal) आणि हिंदीमध्ये अजय देवगण (Ajay Devgn) यांच्या दमदार अभिनयामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पहिल्या आणि दुसऱ्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता प्रेक्षकांची नजर “दृश्यम 3” कडे लागली आहे.

डायरेक्टर जीतू जोसेफ यांचं वक्तव्य

अलीकडेच सोशल मीडियावर “दृश्यम 3” चे डायरेक्टर आणि लेखक जीतू जोसेफ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं –

“मला बोक्स ऑफिस कलेक्शनची चिंता नाही, माझ्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देणं.”

त्यांनी पुढे खुलासा केला की, “दृश्यम 3” ची कथा पहिल्या दोन भागांपेक्षा वेगळी असेल. हा भाग “दृश्यम 2” नंतर चार वर्षांनी सुरू होईल आणि George Kutty च्या आयुष्यातील नवीन पैलू उलगडले जातील.

 “दृश्यम 3” कधी होणार रिलीज? (Drishyam 3 Release Date)
  • शुटिंग सुरू: ऑक्टोबर 2025
  • रिलीज डेट: 2 ऑक्टोबर 2026

या वेळी सिनेमा थेट दोन भाषांमध्ये म्हणजेच मलयाळम आणि हिंदी मध्ये शूट केला जाणार आहे.

  • मलयाळम वर्जनमध्ये पुन्हा मोहनलाल George Kutty च्या भूमिकेत दिसणार.
  • हिंदी वर्जनमध्ये अजय देवगणसोबत श्रिया सरन, तब्बू, अक्षय खन्ना आणि इशिता दत्ता यांची टीम परत येण्याची शक्यता आहे.

हार्दिक जोशीचा जबरदस्त कमबॅक! अरण्य टीझर पाहून प्रेक्षक थक्क; १९ सप्टेंबरला होणार धमाका

चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

या अपडेटनंतर सोशल मीडियावर फॅन्समध्ये उत्साहाची लाट उसळली आहे. एका युजरनं लिहिलं – “George Kutty is back, thrill is back!” तर दुसऱ्याने म्हटलं – “आता वाट पाहवत नाही.”

काय होईल “दृश्यम 3” मध्ये?

पहिल्या दोन भागांप्रमाणेच हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या श्वास रोखून धरणार, अशी चर्चा रंगली आहे. 2 ऑक्टोबर 2026 ला प्रेक्षकांना पुन्हा एकदा एक वेगळा, धडकी भरवणारा सिनेमॅटिक अनुभव मिळणार यात शंका नाही.

तुमच्या मते “दृश्यम 3” पहिल्या दोन भागांप्रमाणेच ब्लॉकबास्टर ठरेल का?

Leave a Comment