Hindustan Unilever Product Prices After GST Cut: महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांसाठी एक मोठी खुशखबर! तुमच्या-आमच्या घरात रोज लागणारा साबण, शाम्पू, टूथपेस्ट आणि बरंच काही आता स्वस्त झालं आहे. विश्वास बसत नाहीये?
देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरने (HUL) आपल्या अनेक लोकप्रिय प्रोडक्ट्सच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तुमचा महिन्याचा किराणा खर्च नक्कीच कमी होणार आहे.
जीएसटी कपातीचा (GST Cut) थेट फायदा आता ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या नवीन किमती असलेले प्रोडक्ट्स तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये दाखल होतील. चला तर मग, उशीर कशाला? पाहूया कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
तुमच्या आवडत्या Brands वर बंपर डिस्काउंट: पाहा संपूर्ण यादी
कंपनीने एका जाहिरातीद्वारे नवीन किमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये तुमच्या आवडत्या ब्रँड्सचा समावेश आहे. लाईफबॉय साबणावर ८ रुपये, डव्ह शाम्पूवर ५५ रुपये, तर क्लोजअप टूथपेस्टवर थेट १६ रुपयांची बचत होणार आहे.
- डव्ह शॅम्पू (३४० मिली): जुनी किंमत – ₹४९०, नवी किंमत – ₹४३५ (बचत: ₹५५)
- लाईफबॉय साबण (७५ ग्रॅम): जुनी किंमत – ₹६८, नवी किंमत – ₹६० (बचत: ₹८)
- क्लोजअप टूथपेस्ट (१५० ग्रॅम): जुनी किंमत – ₹१४५, नवी किंमत – ₹१२९ (बचत: ₹१६)
- सनसिल्क ब्लॅक शॅम्पू (३५० मिली): जुनी किंमत – ₹४३०, नवी किंमत – ₹३७० (बचत: ₹६०)
- क्लिनिक प्लस शॅम्पू (३५५ मिली): जुनी किंमत – ₹३९३, नवी किंमत – ₹३४० (बचत: ₹५३)
- लक्स साबण (७५ ग्रॅम X ४ पॅक): जुनी किंमत – ₹९६, नवी किंमत – ₹८५ (बचत: ₹११)
- लाईफबॉय साबण (७५ ग्रॅम X ४ पॅक): आता फक्त ₹६० मध्ये मिळणार.
आयकर रिटर्न भरण्यासाठी फक्त 7 दिवस बाकी! चुकलात तर भरावे लागेल मोटा दंड; आता गडबड करू नका!
किचन आणि हेल्थ बजेटलाही दिलासा!
फक्त पर्सनल केअर प्रोडक्ट्सच नाही, तर किचनमधील आणि आरोग्याशी संबंधित वस्तूंच्या किमतीही कमी झाल्या आहेत.
- हॉर्लिक्स (२०० ग्रॅम जार): जुनी किंमत – ₹१३०, नवी किंमत – ₹११० (बचत: ₹२०)
- ब्रू कॉफी (७५ ग्रॅम): जुनी किंमत – ₹३००, नवी किंमत – ₹२७० (बचत: ₹३०)
- किसान जॅम (२०० ग्रॅम): जुनी किंमत – ₹९०, नवी किंमत – ₹८० (बचत: ₹१०)
- किसान केचप (८५० ग्रॅम): जुनी किंमत – ₹१००, नवी किंमत – ₹९३ (बचत: ₹७)
- बूस्ट (२०० ग्रॅम): जुनी किंमत – ₹१२४, नवी किंमत – ₹११० (बचत: ₹१४)
- नॉर टोमॅटो सूप (६७ ग्रॅम): जुनी किंमत – ₹६५, नवी किंमत – ₹५५ (बचत: ₹१०)
- हॉर्लिक्स वुमन (४०० ग्रॅम): जुनी किंमत – ₹३२०, नवी किंमत – ₹२८४ (बचत: ₹३६)
- लॅक्मे ९ ते ५ कॉम्पॅक्ट (९ ग्रॅम): जुनी किंमत – ₹६७५, नवी किंमत – ₹५९९ (बचत: ₹७६)
एकंदरीत, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे, पुढच्या वेळी किराणा सामान खरेदी करायला जाल, तेव्हा या नवीन किमती नक्की तपासा आणि तुमच्या हक्काच्या बचतीचा फायदा घ्या!

योगेश कोल्हे हे व्यवसाय, शेअर बाजार, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील घडामोडी या विषयांवर लेखन करणारे एक उत्साही लेखक आहेत. ते वाचकांना सोप्या व स्पष्ट भाषेत उपयुक्त, माहितीपूर्ण आणि अद्ययावत लेख उपलब्ध करून देतात.




