कोरडवाहू क्षेत्र विकास योजना: तुमचं शेत कोरडं आहे आणि उत्पन्न कमी होतंय म्हणून चिंता वाटतेय? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे! महाराष्ट्र शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची योजना सुरू केली आहे, जी तुमच्या शेतात क्रांती घडवू शकते.
महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर नुकतीच ‘कोरडवाहू क्षेत्र विकास योजना’ (Rainfed Area Development Programme) ॲड करण्यात आली आहे. अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, ही योजना नेमकी काय आहे आणि आपल्याला याचा लाभ कसा मिळेल? चला, सविस्तर माहिती घेऊया.
कोरडवाहू क्षेत्र विकास योजना काय आहे आणि तिचा उद्देश काय?
2015 पासून सुरू झालेल्या या योजनेचा मुख्य उद्देश कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यांना एकात्मिक शेती पद्धती (Integrated Farming System) अवलंबण्यास प्रोत्साहन देणे आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, केवळ एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा देऊन शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे.
या योजनेत फक्त पिकांचा विचार नाही, तर पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीची आरोग्य व्यवस्था, फळबागा, पशुपालन, मत्स्यपालन आणि अगदी मधमाशी पालनासारख्या गोष्टींचाही समावेश आहे. म्हणजे, एकाच योजनेत अनेक गोष्टींचा फायदा मिळण्याची संधी आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यांत योजना, पण तुमच्या गावात आहे का?
ही योजना राज्याच्या सर्व 34 जिल्ह्यांमध्ये राबवली जात असली, तरी ती प्रत्येक गावात किंवा तालुक्यात उपलब्ध नाही. 2025-26 या वर्षासाठी प्रत्येक उपविभागातून दोन गावांची निवड केली जाणार आहे. गावाच्या निवडीसाठी काही खास निकष आहेत. जसे की,
- तालुक्यातील 60% पेक्षा जास्त क्षेत्र पावसावर अवलंबून असलेले गाव.
- नैसर्गिक शेती करणारे गाव.
- वॉटरशेड डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत मागील 20 वर्षांत काम झालेले गाव.
तुमचं गाव या निकषांमध्ये बसतं का? हे तपासण्याची सोपी पद्धत पुढे दिली आहे.
कोरडवाहू क्षेत्र विकास योजने मध्ये अनुदान किती आणि कशासाठी मिळेल?
या योजनेत शेतकऱ्याला जास्तीत जास्त 30,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे अनुदान मिळवण्यासाठी तुमच्याकडे किती जमीन आहे, याचं बंधन नाही. सगळ्या शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम समान असणार आहे.
अनुदानाचा वापर खालील बाबींसाठी केला जाऊ शकतो:
- पीक शेती: पौष्टिक अन्नधान्य, तेलबिया, कडधान्य, भाजीपाला, चारा पिके.
- एकात्मिक शेती: दुधाळ गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, फळझाडे.
- शेतीपूरक व्यवसाय: मुरघास युनिट (दहा मुरघास बॅग), चाप कटर, वजन काटा.
- इतर: मत्स्यपालन, मधमाशी पालन, गांडूळ खत निर्मिती.
म्हणजेच, शेतीसोबतच पशुपालन, मत्स्यपालन यांसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार तुम्हाला आर्थिक मदत देणार आहे.
तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही राज्यातील शेतकरी असणं आवश्यक आहे. तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेला असावा. सर्वात महत्त्वाचं, तुमच्याकडे ‘Grextag’ चा फार्मर आयडी (Farmer ID) असणं बंधनकारक आहे. जर तुमच्याकडे हा आयडी नसेल, तर लगेच तो जनरेट करून घ्या.
सौर ऊर्जा पंपाला मिळणार सुरक्षा कवच–सरकार देतंय सोलरसाठी कुंपण जवळपास फ्री! असा करा अर्ज
कोरडवाहू क्षेत्र विकास योजना यादीत नाव आहे की कसे चेक करायचे ?
सध्या निवड झालेल्या गावांची यादी सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे, तुमचं गाव या योजनेच्या कार्यक्षेत्रात येतं की नाही, हे तपासण्याचा सर्वात सोपा आणि अचूक मार्ग म्हणजे महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करणे.
- महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवर जा.
- लॉगिन करा आणि तुमचा फार्मर आयडी टाका.
- ‘कोरडवाहू क्षेत्र विकास’ योजनेच्या बाबी निवडण्यावर क्लिक करा.
जर तुम्हाला अर्ज करण्याचा पर्याय (option) दिसला, तर समजून घ्या की तुमच्या गावाचा समावेश या योजनेत झाला आहे. जर पर्याय दिसला नाही, तर तुमच्या गावाचा सध्या निवडलेल्या गावांमध्ये समावेश झालेला नाही.
या योजनेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना (Guidelines) 2025-26 साठी निर्गमित झाल्या आहेत. तुम्ही त्या सुद्धा महाडीबीटीच्या अधिकृत वेबसाईटवर तपासू शकता.
मित्रांनो, या योजनेचा उद्देश तुमच्यासारख्या कोरडवाहू शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. त्यामुळे लगेच चेक करा आणि संधी मिळाली तर या 30,000 रुपयांच्या अनुदानाचा फायदा नक्की घ्या!
अधिक माहिती साठी खाली दिलेला व्हिडिओ ही पाहू शकता

योगेश कोल्हे हे व्यवसाय, शेअर बाजार, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील घडामोडी या विषयांवर लेखन करणारे एक उत्साही लेखक आहेत. ते वाचकांना सोप्या व स्पष्ट भाषेत उपयुक्त, माहितीपूर्ण आणि अद्ययावत लेख उपलब्ध करून देतात.




