तुम्हाला माहित आहे का समुद्रामधील तारावर चालू आहे इंटरनेट! पण तारांचा मालक आहे तरी कोण ? 

Owner of Undersea Internet Cables: आपण मोबाईलवर नेट वापरताना नेहमी टॉवर किंवा सेटलाइटवरच अवलंबून आहोत असं मानतो. पण खरी गोष्ट काही आणि आहे. जगातील तब्बल 99 टक्के इंटरनेट ट्रॅफिक हे समुद्राखाली टाकलेल्या केबल्समधून फिरतं. हो, अगदी खरं !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही महिन्यांपूर्वी Red Sea मधील एक केबल कट झाली आणि लगेच अनेक देशांचं इंटरनेट कोलमडलं. तेव्हाच पुन्हा एकदा स्पष्ट झालं – इंटरनेटची खरी लाईफलाइन ही आकाशात नाही तर खोल समुद्रात दडलेली आहे. पण सर्वात मोठा प्रश्न असा की, या केबल्सचा मालक नेमका कोण आहे?

किती मोठं आहे हे जाळं?

BBC च्या माहितीनुसार, सध्या जगभर 1.4 मिलियन किलोमीटर undersea केबल्स पसरलेल्या आहेत. जर या सर्व केबल्स एका सरळ रेषेत जोडल्या, तर त्यांची लांबी सूर्याच्या व्यासाएवढी होईल.

पूर्वी कोण होते मालक?

पूर्वी या केबल्सचं मालकत्व प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्यांच्या consortium कडे असायचं. काही कंपन्या मिळून एकत्र गुंतवणूक करून केबल टाकायच्या आणि जो कोणी वापरायचा त्याला consortium मध्ये सामील व्हावं लागायचं.

iPhone 17 मिळत आहे iPhone 16 पेक्षाही स्वस्त ? कुठे आणि कसा समजून घ्या किमतीच गणित 

आता चित्र बदललंय!

१९९० नंतर परिस्थिती बदलायला लागली. खासगी कंपन्यांनी स्वतःच्या केबल्स टाकायला सुरुवात केली. आणि आता तर Google, Meta (Facebook), Microsoft, Amazon सारखे जगातील मोठे टेक दिग्गज थेट या प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणूक करत आहेत.

आज बहुतांश नवीन undersea केबल्स याच कंपन्यांच्या मालकीच्या किंवा त्यांच्या मोठ्या हिस्सेदारीच्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर, जगाचं इंटरनेट आता केवळ टेलिकॉम कंपन्यांच्या हातात नाही तर मोठ्या टेक कंपन्यांच्या ताब्यात गेलंय.

आपल्याला वाटतं इंटरनेट “cloud” मध्ये आहे. पण खरी गोष्ट अशी की तो “ocean” मध्ये दडलाय. आणि या समुद्री केबल्सवर नियंत्रण ठेवणारं जाळं आज काही सरकारकडे नाही तर खासगी टेक जायंट्सकडे आहे.

पुढच्या वेळी नेट स्लो झालं तर फक्त टॉवर किंवा WiFi ला दोष देण्याआधी हा प्रश्न नक्की आठवा – आपल्या इंटरनेटचा खर मालक नक्की कोण आहे?

Leave a Comment