Realme P3x 5G: भारतामध्ये बजेट स्मार्टफोन सेगमेंटमध्ये स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. या दरम्यान Realme ने ग्राहकांसाठी एक भन्नाट पर्याय आणला आहे. Realme P3x 5G हा दमदार स्मार्टफोन आता Flipkart वर खास ऑफर्ससह उपलब्ध आहे आणि त्याची किंमत केवळ ₹12,999 ठेवण्यात आली आहे.
तर चला तर बघूया या कमी किमतीच्या 5G फोन मध्ये कोणती खास फिचर्स आहेत .
Realme P3x 5G चे दमदार फीचर्स
या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे तो IP69 रेटिंगसह वॉटरप्रूफ आहे. म्हणजेच पावसात किंवा पाण्यात पडल्यावरही फोन सुरक्षित राहतो.
- IP69 रेटिंगसह वॉटरप्रूफ डिझाइन – पाणी, धूळ किंवा पावसातही फोनला नुकसान होणार नाही.
- 6000mAh बॅटरी + 45W फास्ट चार्जिंग – एकदा चार्ज केला की सहज 2 दिवसांपर्यंत चालतो.
- 50MP रियर कॅमेरा – हाय-क्वालिटी फोटो आणि व्हिडिओसाठी.
- 8MP फ्रंट कॅमेरा – सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी.
- MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर – गेमिंग आणि मल्टिटास्किंगमध्ये स्मूद परफॉर्मन्स.
- 6.72 इंच Full HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह – स्क्रोलिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगला अल्ट्रा-फ्लुइड अनुभव.
- 8GB पर्यंत रॅम + 128GB स्टोरेज – मल्टिपल अॅप्स आणि मीडिया स्टोरेजसाठी पुरेसा स्पेस.
- व्हेगन लेदर फिनिश डिझाइन – प्रीमियम लुक आणि आरामदायी ग्रिप.
किंमत आणि ऑफर्स
Flipkart वर Realme P3x 5G चा 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरियंट ₹12,999 मध्ये मिळतो.
- निवडक बँक कार्ड्सवर 5% कॅशबॅक
- जुना फोन एक्स्चेंज करून ₹11,550 पर्यंत सूट
(नोंद: एक्स्चेंज डिस्काउंट जुना फोन आणि त्याच्या कंडिशनवर अवलंबून असतो.)
4 कॅमेरे, AI फीचर्स आणि दमदार बॅटरी! Samsung Galaxy S25 FE च्या किंमतीचा धक्कादायक खुलासा
उपलब्ध कलर ऑप्शन्स
हा स्मार्टफोन तीन आकर्षक रंगांमध्ये येतो:
- लूनर सिल्व्हर
- मिडनाइट ब्लू
- स्टेलर पिंक
ज्यांना कमी बजेटमध्ये लाँग बॅटरी, वॉटरप्रूफ फीचर, फास्ट परफॉर्मन्स आणि स्टायलिश डिझाइन हवे आहे, त्यांच्यासाठी Realme P3x 5G एक बेस्ट स्मार्टफोन ठरू शकतो.

सुंदर मोरे हे ऑटोमोबाईल्स, कार्स, बाईक्स तसेच तंत्रज्ञान क्षेत्रातील मोबाईल लॉन्चेस आणि गॅझेट्स यांवर माहितीपूर्ण लेखन करणारे लेखक आहेत. ते वाचकांना नवी मॉडेल्स, तंत्रज्ञानातील बदल व ट्रेंड्स यांची स्पष्ट आणि आकर्षक माहिती सोप्या भाषेत पोहोचवतात.




