TVS Jupiter Special Edition लाँच: ऑल-ब्लॅक लूक, ब्रॉन्झ बॅजिंग आणि दमदार फीचर्स – पाहा काय आहे खास

TVS Jupiter Special Edition: भारतीय दोनचाकी बाजारात स्कूटर्स म्हटलं की सर्वात आधी नाव येतं Honda Activa आणि TVS Jupiterचं. आता हाच जुपिटर घेऊन आलाय एकदम झकास अवतारात! TVS ने नुकताच Jupiter Special Edition भारतात लाँच केला आहे, आणि हा मॉडेल खरोखरच नजरा खेचणारा ठरत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Jupiter Special Edition लूक

नव्या StarDust Black Special Edition मध्ये कंपनीने फक्त कलरचेंज करून मोठा बदल घडवला आहे. संपूर्ण बॉडी ऑल-ब्लॅक पेंट स्कीममध्ये सजवण्यात आली आहे.

पण गंमत बघा – लोगो आणि मॉडेल नेम यावेळी ब्रॉन्झ फिनिशमध्ये दिले आहेत. त्यामुळे हा स्कूटर रस्त्यावर दिसला तर लोकांच्या नजरा आपोआप थांबणार, यात शंका नाही!

फीचर्स (TVS Jupiter Special Edition)
  • फ्रंट डिस्क ब्रेक – सेफ्टीमध्ये कुठलाही कॉम्प्रमाईज नाही
  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह डिजिटल डिस्प्ले – कॉल, मेसेज अलर्टसह स्मार्ट फीचर्स
  • LED हेडलॅम्प – रात्रीची राइड झाली आता अजून क्लिअर
  • 21-लिटर बूट स्पेस – शॉपिंग बॅग असो की हेल्मेट, सहज बसणार
  • पण एक वेगळी गोष्ट – यात किकस्टार्टर नाही! मात्र, ग्राहकांना एक्सेसरी म्हणून लावता येतो
 इंजिन आणि परफॉर्मन्स

जुपिटर स्पेशल एडिशनमध्ये 110cc एअर-कूल्ड इंजिन आहे, जे 8 bhp पॉवर आणि 8.8 Nm टॉर्क निर्माण करतं. कंपनीच्या दाव्यानुसार, हा स्कूटर 50 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकतो. कमी खर्चात दमदार परफॉर्मन्स हीच या Jupiter ची खासियत आहे.

किंमत (TVS Jupiter Special Edition Price)

मुंबई (Ex-showroom) या स्पेशल एडिशनची किंमत ₹94,381 ठेवण्यात आली आहे.

तुलना केली तर:

  • DRUM – ₹79,581
  • DRUM ALLOY – ₹85,231
  • DRUM SXC – ₹89,381
  • DISC SXC – ₹93,181
  • Special Edition – ₹94,381

यामुळे हा व्हेरिएंट फक्त Jupiter लाइन-अपमधलाच नव्हे तर भारतामध्ये विकला जाणारा दुसरा सर्वात महाग 110cc स्कूटर ठरतो!

6 एअरबॅग, सनरूफ आणि ADAS! फक्त 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत येतेय नवी Hyundai Venue SUV

स्पर्धक कोण?

या Jupiter Special Edition ला थेट टक्कर देणार आहेत –

  • Honda Activa H-Smart
  • Hero Xoom 110
  • Honda Dio 110

मात्र, Jupiter चा ऑल-ब्लॅक लूक आणि प्रीमियम फिनिशिंग त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतो.

तर मंडळी, रोजच्या धावपळीला स्टाईलचा टच द्यायचा असेल, तर हा Jupiter Special Edition तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो. दिसायला झकास, फीचर्स टेक्नॉलॉजीने भरलेले आणि परफॉर्मन्स हमखास भरोसेमंद –हाच या स्कूटरचा USP आहे.

Leave a Comment