Virat Kohli and Anushka Life in London: टीम इंडियाचा रनमशीन, विराट कोहली आणि त्याची सुपरस्टार पत्नी अनुष्का शर्मा, हे दोघं आता लंडनमध्ये स्थायिक झाले आहेत. पण, भारतातून दूर गेल्यावरही त्यांची चर्चा काही थांबत नाही. खासकरून आता, महिला क्रिकेटपटू जेमिमाह रॉड्रिग्सने त्यांच्याबद्दल एक भन्नाट किस्सा सांगितला आहे, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
का केली कॅफे मधून वीर अनुष्का ची हकालपट्टी
जेमिमाहने एका मुलाखतीत सांगितलं की, एकदा न्यूझीलंडमध्ये असताना ती आणि स्मृती मानधना यांनी विराटला फलंदाजीबद्दल काही टिप्स घेण्यासाठी गाठलं. सुरुवातीला एका कॅफेमध्ये ही भेट फक्त क्रिकेटपुरती मर्यादित होती. पण, थोड्याच वेळात अनुष्का शर्मा तिथे आली आणि गप्पांचं स्वरूपच बदललं.
जेमिमाह सांगते, “विराट कोहलीने आम्हा दोघींना सांगितलं, ‘तुमच्यात महिला क्रिकेटचं भविष्य बदलण्याची ताकद आहे!’.
” क्रिकेटच्या गप्पा हळूहळू आयुष्याच्या गोष्टींमध्ये कधी बदलल्या, हे त्यांना कळलंच नाही. तब्बल चार तास ही दिलखुलास चर्चा सुरू होती. ही भेट इतकी खास होती की, जणू काही जुने मित्र बऱ्याच वर्षांनी भेटले होते. गप्पा थांबल्या, कारण… कॅफेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना चक्क बाहेर काढलं!
विराट-अनुष्का लंडनमध्ये का गेले?
विराट आणि अनुष्का भारतातले सर्वात मोठे सेलिब्रिटी आहेत. त्यांची प्रत्येक गोष्ट पापराजी आणि मीडियाच्या नजरेत असते. या सततच्या फेमस लाईफस्टाईल पासून थोडं दूर जाण्यासाठी आणि खासकरून आपल्या मुलांना सामान्य आयुष्य देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.
अभिनेत्री माधुरी दीक्षितचा नवरा डॉ. श्रीराम नेने यांनी एका पॉडकास्ट मध्ये यावर खुलासा केला होता. ते म्हणाले,
“त्यांना त्यांच्या यश आणि प्रसिद्धीचा भारतात पुरेपूर आनंद घेता येत नाही. कारण सतत लोकांचं लक्ष त्यांच्यावर असतं. त्यामुळेच त्यांनी मुलांना नॉर्मल आयुष्य देण्यासाठी लंडनला शिफ्ट होण्याचा विचार केला.”
भलेही हे कपल आता लंडनमध्ये शांत आयुष्य जगत असतील, पण त्यांचा परिणाम अजूनही मोठा आहे. क्रिकेट आणि सिनेमा सोबतच ते सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.
त्यांच्या आणि जेमिमाह यांच्या भेटीवरून हेच सिद्ध होतं की ते आजही युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर आहेत. लंडनमध्ये शांतता शोधणारे हे दोघे त्यांच्या कामातून आणि विचारातून आजही मोठा प्रभाव टाकत आहेत.

सदाशिव गायकवाड हे मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रावर लेखन करणारे लेखक आहेत. ते वाचकांना सिनेसृष्टीतील घडामोडी, खेळांच्या बातम्या व विश्लेषण रोचक आणि सोप्या पद्धतीने सादर करतात.




